ह्या Tips आणि Tricks Follow करा मराठी मध्ये 80 पैकी 80 मार्क Fix ...

 ह्या Tips आणि Tricks Follow करा मराठी मध्ये 80 पैकी 80 मार्क Fix ...





प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
इयत्ता दहावीच्या कृतिपत्रिकांच्या अद्ययावत आराखड्यांनुसार तुम्ही बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली असेलच. आता या तयारीमध्ये तुम्ही' आभ्यासाला' अग्रस्थान दिले आहे, याचा अर्थ तुमची तयारी योग्य दिशेने सुरू झाली आहे. 'मराठी कुमारभारती' या विषयाच्या कृतिपत्रिकेच्या अद्ययावत आराखड्यानुसार अभ्यास करताना कृतिपत्रिकेतील विभागांनुसार तुम्ही कशी तयारी करावी हे जाणून घ्या....
------------------+  विभाग १ गदय +--------------------
या विभागात २ पठित गदय उताऱ्यांवर आणि १ अपठित गदय उताऱ्यावर आधारित कृती विचारल्या जातील. या विभागाची तयारी करताना पाठ्यपुस्तकातील पाठ परत एकदा एकाग्रतेने वाचून घ्यावेत. उताऱ्यातील छोट्या छोट्या तपशिलांकडे बारकाईने लक्ष दयावे शिवाय मार्गदर्शकात प्रत्येक उतान्यातील महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत. हे लक्षात घेऊन स्वतः आकलन कृती तयार करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आकलनाच्या कृती तुम्ही सहजगत्या सोडवू शकाल. स्वमत कृतीत आपले मत मांडताना ते तारतम्याने मांडावे. त्याची मांडणी मुद्देसूद करावी. स्वत:च्या शब्दांत स्वतःचे मत मांडावे.
------------------+ विभाग २: पदय +--------------------
या विभागात कवितांवर (अ) प्रश्न आधारित कृती (आ) मुद्दयांच्या आधारे कृती आणि (इ) रसग्रहण कृती या तीन प्रकारच्या कृती विचारल्या जातील. पदय विभागातील बहुतेक कृती सोडवण्यासाठी प्रत्येक कवितेचा भावार्थ या पुस्तकातील या प्रश्नसंचात दिलेला आहे. तो पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्यावा. त्यामुळे पदय विभागातील कृती तुम्ही सहजतेने सोडवू शकाल.
----------------+ विभाग ३ : स्थूलवाचन +------------------
या विभागात उतारा दिला जाणार नाही. तसेच वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या कृतीही विचारल्या जाणार नाहीत. पाठाच्या संपूर्ण आशयावर साधारणतः स्वमत / अभिव्यक्ती स्वरूपाची कृती विचारली जाईल. यासाठी गोष्टीस्वरूप असलेल्या या पाठांचे परत एकदा वाचन करावे आणि त्यांतील महत्त्वाचे मुद्दे टिपात्मक स्वरूपात मांडण्याचा सराव करावा. अशा प्रकारे स्थूलवाचनावरील कृतींची तयारी तुम्ही करू शकाल.


----------+विभाग ४: व्याकरण व भाषाभ्यास+-----------
या विभागातील कृती या गणितासारख्या सर्वच्या सर्व गुण मिळवून देऊ शकणाऱ्या कृती असतात. त्यासाठी अभ्यासक्रमानुसार समास शब्दसिद्धी, वाक्प्रचार तसेच शब्दसंपत्ती, लेखननियम विरामचिन्हे, पारिभाषिक शब्द या सर्व घटकांचा काटेकोरपणे अभ्यास करावा. तेव्हा यामध्ये सर्वच्या सर्व गुण मिळवायचेच, असा निश्चय करावा.
-------------+विभाग ५: उपयोजित लेखन+--------------
या विभागात पत्रलेखन किंवा सारांशलेखन, जाहिरातलेखन, बातमीलेखन, कथालेखन व निबंध या लेखनप्रकारांवर आधारित कृती असतील. या पुस्तकामध्ये प्रत्येक लेखनप्रकाराचे पुरेसे मार्गदर्शन, सोडवलेल्या नमुना कृती आणि स्वाध्यायासाठी कृती दिलेल्या आहेत. यांचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या भाषेत या लेखनकृती सोडवण्याचा सराव करावा. म्हणजे या लेखनप्रकारांशी तुमची मैत्री होईल आणि परीक्षेमध्ये हा विभागही तुम्ही वेळेमध्ये सहजतेने सोडवू शकाल.
मित्रांनो. आता मागे वळून बघायचे नाही. अभ्यास करा, यश तुमचेच आहे!
बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हांला हार्दिक शुभेच्छा !!




Comments