छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जोरदार भाषण व जबरदस्त व्याख्यान 🔥

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जोरदार भाषण व जबरदस्त व्याख्यान  🔥


आदी शक्ती तुळजा भवानी, उभ्या हिंदुस्तान च आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रतल्या मराठी माणसाला जगावं कस ते शिवजी महाराजांनी शिकवलं जगताना शेवटच्या श्वास पर्यंत लढावं कस हे सुद्धा शिवाजी महाराजांनी शिकवलं अश्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज च्या स्मृतीला अभिवादन करून मी माझ्या भाषांना ची सुरवात करतो. आज च्या कार्यक्रम चे माननिय अध्यक्ष, मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, तसेच सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर व देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात उत्साहाने साजरी होत आहे, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, अशा अनेक उपक्रमाने आज जयंती साजरी होताना दिसत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड केली जात
आहे. महाराष्ट्रात अनेक संघटनांनी आपापल्या परीने शिवचरित्र जगा समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खरे खुरे रयतेचे राजे होते. राजकीय पक्ष मात्र आपल्या सत्तेसाठी त्यांचा उपयोग करताना दिसत आहेत. तारीख, तिथीचा वाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतो आहे, दुर्दैव या मातीच आज त्यांच्याच मातीत, त्यांच्याच स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज हा एक राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोगी पडणारे समीकरण ठरले आहेत. शिवरायांच्या नावाने मतपटीत मतांची भीक मागत फिरकत आहेत.
मावळ्यानो छ. शिवाजी महाराज हे राजकीय लढवय्ये नक्कीच होते. परंतु, विशिष्ट एखाद्या पक्षांसाठी मर्यादित नव्हते. छ. शिवाजी महाराज हे एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी संघर्ष करणारे राजे नव्हते.


आपल्याच महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या महापुरुषांच्या जन्मतारखेवरून वाद पेटवला जातो, जाती धर्मात
शिवरायांना गुंतवून ठेवतो, ही लाजिरवाणी बाब आहे.
छ. शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आजच्या तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची नीती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचा संघर्ष या सर्व बाबी बारकाईने समजावून शिवशाही
अमलात आणणे काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांच संघर्ष हा कुठल्या जात व धर्म संघर्ष नव्हता तर शिवाजी महाराजांचा संघर्ष हा रयतेच्या राज्यासाठी संघर्ष होता. शिवराय अठरापगड जातीचे, सर्व धर्माचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या स्वराज्यात जाती धर्माला थारा नव्हता.
जगात शिवनीतीचा वापर करून अनेक योद्धे लढाया जिंकल्याची उदाहरणे आहेत, अमेरिकेचे माझी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात, जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते, तर आम्ही त्यांना सूर्य संबोधले असते. या महाराष्ट्रात शिवरायांचा गौरवशाली इतिहास पुसण्याच्या प्रयत्न सुरू आहे.
इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले. परंतु, जाता जाता इंग्रज गव्हर्नर म्हणतात, छ. शिवाजी महाराज जर अजून 10 वर्षे जगले असते, तर इंग्रजांना हिंदुस्थानचा चेहरा पाहता आला नसता. असे रयतेचे राजे होते छत्रपती शिवराय!
आजच्या युवा वर्गानी वरील गोष्टीचा चिंतन करावे. केवळ दाढी मिशी वाढवून कपाळी चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसते, तर त्यासाठी जिजाऊंचे संस्कार पाहिजेत. जर तस झालंच असतं तर आज या महाराष्ट्रात महिला वर्ग सुरक्षित राहिला असता.

आज आम्ही आमचा इतिहास विसरत चाललो आहोत. डॉ. बाबासाहेबांनी म्हटले आहे, जो समाज स्वतःचा
इतिहास विसरतो, तो कधी इतिहास निर्माण करू शकत नाहीत, अगदी तेच झाले. आम्ही आमचा इतिहास
विसरलो आणि मनुवाद्यांकडे आमचे डोके गुलाम ठेवले. म्हणून तर महाराष्ट्रात स्त्री स्वातंत्र्याचा मुद्दा वेळोवेळी चव्हाट्यावर येत आहे. शिवरायांच्या स्वराज्यात शत्रूंची महिलादेखील सुरक्षित घरी परतत होती. मावळ्यानो आज गरज आहे हे समजून घेण्याची की मी या स्वराज्याच आहे आणि हे स्वराज्य माझं हे समजून घेण्याची की हा महाराष्ट्र माझा आहे आणि मी या महाराष्ट्रचा. जाता जाता दोन ओळी सांगून जातो,

" जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्या ची मती | "
" अरे मारण्याची कोणाला भीती आदर्श आमचे राजे शिव छत्रपती | "








Comments